झाड अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

2

गोवा-धारबांदोडा येथील घटना;कामावर जाताना घडला प्रकार…

वास्को ता२२: येथील स्वतंत्रपथ मार्गावरील भलेमोठे जुने अशोका वृक्ष अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वार सतीश गोपाळ गावकर (वय ४१) ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज पहाटे घडली.धारबांदोडा येथे राहणारा सतीश कामासाठी सडा, मुरगाव येथे जात होता.मात्र अचानक हे झाड वीज खांब्यावर कोसळल्यानंतर त्याच्यावर असलेली एक वीज वाहीनी सतीशच्या गळ्यात अडकून मान तुटल्याने तो जागीच मरण पावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

4