वेंगुर्लेत उद्या जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त गुणवंत खेळाडूंचा होणार सत्कार

137
2

वेंगुर्ले : ता. २२: वेंगुर्ला येथे उद्या २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त गुणवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आधार फाउंडेशन वेंगुर्ला व वेंगुर्ला तालुका क्रीडा समन्वयक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व वेंगुर्ला हायस्कुल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उद्या सकाळी १० वाजता वेंगुर्ला हायस्कुल येथे होणार आहे. या कार्यक्रमात वेंगुर्ला शहर तसेच तालुक्यातील २५ खेळाडूंना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सन २०१९- २० सालात या सर्व खेळाडूंना तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यकत्या ठिकाणी विविध संघटनांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या एकमेव उपक्रमाला क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

4