गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार ; पालकमंत्री केसरकर

344
2

मालवण, ता. २२ : गेले वर्षभर प्रतीक्षा असलेल्या चिपी विमानतळावरून येत्या २ सप्टेंबर पासून विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज चिपी येथे दिली.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज चिपी विमानतळास भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, विलास साळसकर, बाळा जवळी, विजय घोळेकर, आबा कोंडसकर, सचिन देसाई, आयआरबीचे राजेश लोणकर, एमआयडीसीचे अविनाश रेंवणकर, एमएससीबीचे प्रमोद लवेकर, नगरसेवक संदेश निकम आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. केसरकर, श्री. राऊत यांच्या उपस्थितीत चिपी विमानतळ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विमानतळाची बरीच कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे येत्या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू केली जाणार आहे असे श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले.

4