दोडामार्ग तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासाठी २२ कोटी १९ लाखांचा निधी…

163
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पात केली तरतूद…

दोडामार्ग ता.२२: तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालय यासाठी शासनाने तब्बल 22 कोटी 19 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तालुक्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न आता सत्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पना निधीची तरतूद केली असून आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे अंदाजपत्रक आखण्यास प्रशासकीय मान्यताही दिली आहे.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून सात वर्ष झाली. मात्र निधीची तरतूद केली नव्हती त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे घोंगडे भिजत पडले होते. दोन वर्षापूर्वी तालुक्‍यात झालेल्या आरोग्याच्या जनआक्रोश आंदोलनावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 50 खाटांचे दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्‍वासनाची पूर्तता अखेर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. अर्थ संकल्पना त्यांनी रुग्णालयासाठी तब्बल 22 कोटी 19 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्ग आता मोकळा झाला आहे

\