नारायण कुबल यांनी अर्जाद्वारे वेधले तहसीलदारांचे लक्ष…
आचरा, ता. २२ : तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनसाठी पोटनिवडणूक २३ जूनला होत असताना या प्रभागाच्या मतदार यादीतून ५६ मतदारांची नावेच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आचर्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते नारायण कुबल यांनी तहसीलदारांकडे धाव घेत अर्जाद्वारे लक्ष वेधले आहे.
श्री. कुबल यांनी अर्जात नमूद केले आहे की, १७ फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधील मतदार संख्या ८५१ होती. मात्र आता जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदारांची संख्या ही ७९३ दिसून येत आहे. म्हणजेच या यादीतून ५६ मतदारांची नावे गायब झाली आहे. या प्रकारामुळे ५६ मतदार वंचित राहणार आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालावा अशी मागणी श्री. कुबल यांनी तहसीलदारांकडे केली आहे.