कॅन मधून पेट्रोल, डिझेल नेणाऱ्या व्यक्तींविरोधात धडक मोहिम;महेश गुरव…

2

कणकवलीत पोलीसांची कारवाई;शेतकऱयांवर अन्याय झाल्यास आंदोलन…

कणकवली, ता.२२ : सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील काही पेट्रोल पंपांवरून पेट्रोल व डिझेल कॅनमधून नेत असल्यास कारवाई करा़ त्यानुसार कणकवली पोलीसांनी सात ते आठ जणांनावर प्रतिबंधात्मक कारवाई केली़ या कारवाईत शेतीसाठी पॉवर टिलरसाठी डिझेल नेताना अनेक शेतकऱ्याना पोलीसांनी ताब्यात घेतले़ त्यात कहर म्हणजे कणकवलीतील पोलीस पेट्रोल पंपावरून डिझेल नेताना कारवाई करण्यात आली़ जर ज्वलनशील पदार्थ कॅनमधून देण्यास कायदेशीर बंदी असेल मग पोलीसांच्या पेट्रोल पंपावरून कॅनमधून डिझेल का दिले? असा संतप्त सवाल कणकवली पंचायत समिती माजी सभापती महेश गुरूव यांनी केला़
या कारवाईत सर्वसामान्य शेतकऱ्याना फटका बसला आहे़ पॉवरटिलर घेऊन शेतकरी पेट्रोल पंपावर येऊ शकत नाहीत? कारण शेती करण्यासाठी पॉवर टिलरला नांगरणीसाठी अवजारे लावली जातात़ येण्या-जाण्यासाठी डिझेल व वेळेचा अपव्यय होतो़ त्यामुळे दहा लिटरपर्यंत डिझेल शेतकरी नेत असतात़ केवळ जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार चुकीच्या पध्दतीने पेट्रोलपंपावर शेतीच्या मोसमात पोलीस कारवाई करत असतील तर स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महेश गुरव यांनी दिला आहे़
सिंधुदुर्गात डिझेल व पेट्रोलचा साठा करण्यासाठी शेतकरी डिझेल घेत नाहीत़ आताची गरज लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांनी शेतकºयांना सहकार्य करावे़ सरसकट कारवाई केल्यास श्ोतीच्या मोसमात असंख्य शेतकºयांना विनाकारण दंडाचा फटका बसणार आहे़ ही कारवाई शेतकºयांसाठी पोलीस अधिक्षकांनी थांबवावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे महेश गुरव यांनी केली आहे़.

7

4