गोवा-बांबुळीत पुन्हा एकदा सोमवार पासून मोफत उपचार

2

सावंतवाडीतील राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्याला यश

तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रयत्न

सावंतवाडी ता.२२: गोवा बांबुळी येथील रुग्णालयात सोमवारपासून पुन्हा मोफत उपचार देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.याबाबत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.यासाठी सावंतवाडीचे माजी नगरसेवक तथा जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पाठपुरावा केला.
गेले दहा दिवस तेथे जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोफत सेवा देणे बंद करण्यात आले होते.महाराष्ट्र शासनाकडून राजीव गांधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे ४५ लाख रुपये काही कारणास्तव गोवा बांबुळी महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे वर्ग न झाल्यामुळे हा प्रश्‍न निर्माण झाला होता.त्यामुळे संबंधित कॉलेजच्या प्रशासनाने मोफत सुविधा देण्याचे बंद केले होते.मात्र यावेळची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीतील श्री.मसुरकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कॉलेजचे डीन शिवानंद बांदेकर,मनोज प्रभुदेसाई आदींची भेट घेतली होत.व निर्माण झालेल्या तांत्रिक बाबी दूर करून रखडलेले बिल गोवा मेडिकल कॉलेज कडे वर्ग करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते.त्यानुसार पुन्हा सोमवार पासून ही योजना सुरू होणार आहे.

4