आचरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी एस एस ओटवणेकर

2

आचरा –अर्जुन बापर्डेकर : आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी एस एस ओटवणेकर यांची नेमणूक झाली असून शुक्रवारी उशिरा त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
नव्याने रुजू झालेल्या सहाय्यक निरीक्षक ओटवणेकर यांचे शनिवारी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जेराॅन फर्नांडिस यांनी आचरा पोलीस स्टेशनला भेट देऊन स्वागत केले. या वेळी त्यांच्या सोबत आचरा माजी सरपंच राजन गांवकर,चिंदर माजी सरपंच संतोष कोदे, रविंद्र गुरव, प्रशांत पांगे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

4