आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिंधुदुर्गात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

141
2
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात ठिकठिकाणी उपस्थित राहून आ. राणे शुभेच्छा स्वीकारणार

कणकवली, ता.23: महाराष्ट्राचे युवा नेतृत्व कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांचा आज २३ जून रोजी विविध उपक्रमांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढदिवस साजरा केला जाणार आहे. रक्तदान, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, गुणवंतांचे सत्कार, गरजुंना शैक्षणिक साहित्य वाटप, रूग्णांना फळे वाटप, शाळांमध्ये खाऊ वाटप, वृद्धाश्रमांना मदतीचे वाटप असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
देवगड, कणकवली, वैभववाडी तालुक्यात प्रत्येक जिल्हापरिषद गटात स्थानिक पातळीवरही विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान मतदार संघातील तिनही तालुक्यात आ. नितेश राणे स्वत: उपस्थित राहून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
देवगड तालुक्यातील सामाजिक, उपक्रमांना उपस्थिती दर्शवुन आ. नितेश राणे डायमंड हॉल येथे सकाळी ९.३० ते १०.३० वा. वेळेत शुभेच्छा स्वीकारणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने केक कापला जाणार आहे. त्यानंतर ११ ते १२ या वेळेत वैभववाडी तालुक्यातील कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या शुभेच्छा स्वीकारतील. महाराणा प्रतापसिंह कलादालनाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकार करतील. दुपारी १२.३० वा. कणकवली येथे प्रहार भवन सभागृहात आ. नितेश राणे शुभेच्छा स्वीकारतील. यावेळी विविध समाजोपयोगी उपक्रमांनाही भेटीदेणार आहे. यावेळी विविध संघटनांच्या माध्यमातुन सत्कार केले जाणार आहे.