नितेश राणेंचा वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप

2

 

सावंतवाडी, ता.२३ : आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुका स्वाभिमानच्यावतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब, महिला व बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ,पंढरीनाथ राऊळ, नगरसेवक राजू बेग, अँड. परिमल नाईक, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, चित्रा देसाई, शैलेश तावडे, विनायक ठाकुर, मनोज नाटेकर, संदीप नेमळेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, वामन नार्वेकर, सुनंदा राऊळ आदी उपस्थित होते.

4