दीपक केसरकर: चांदा ते बांदा योजनेतून देणार अनुदान
सावंतवाडी,ता. २३ : जिल्ह्यातील मूर्तिकारांच्या हातांना वर्षभर काम मिळण्यासाठी चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून त्यांना मुर्त्या सुकविण्यासाठी ओव्हनची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील अनेक मूर्तिकारांना होणार आहे. असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. ते उपस्थित पत्रकारांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मूर्तिकार आहेत मात्र गणेश चतुर्थीचे तीन महिने वगळता त्यांना एरवी रिकामी राहावे लागते. अन्य कामांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे आता त्यांच्या हाताला वर्षभर काम मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी वर्षभर आपले मूर्ती कला जोपासावी आणि रोजगार उपलब्ध करावा यासाठी त्यांना ओव्हनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे केसरकर यांनी सांगितले.