राज्यात प्लास्टिक बंदी फसली तरी सावंतवाडीत यशस्वी…

2

पालिका प्रशासनासह नागरिकात जनजागृती झाल्यामुळे मिळाले यश…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.२३:राज्यात प्लास्टिक बंदी फसलेली असताना सावंतवाडी पालिकेने मात्र या ठिकाणी प्लास्टिक बंदी यशस्वी करून दाखवली आहे.गेल्या काही महिन्यात शहरातील प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्यात पालिका प्रशासनाने यश मिळवले आहे.
सावंतवाडीतील नागरिकांनी पुढाकार सहकार्य केल्यामुळे हा उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य मिळाले.असा विश्वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला.यापुढे सुद्धा प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदी यशस्वी होऊ शकली नाही असा दावा केला जात आहे. सावंतवाडी पालिका मात्र हा उपक्रम राबवण्यासाठी यशस्वी ठरली आहे. पालिकेने राज्य शासनाने जाहीर करण्यापूर्वी शहरात प्लास्टिक बंदीची हाक दिली होती.याला तुरळक विरोध झाला होता.अखेर पालिकेने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर व्यावसायिकांसह ग्राहकांनी सुद्धा प्लास्टिक बंदीला सहकार्य करण्याचे मान्य केले होते.त्यानुसार शहरात बऱ्यापैकी प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घातली होती. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत या बदलाला स्वीकारले होते. त्यामुळे राज्यात प्लास्टिक बंदी अयशस्वी झाली तरी या ठिकाणी मात्र फायदा झाला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रशासनासह नागरिकांचे आभार मानले आहेत

5

4