पडवे येथे तीनपानी जुगारावर पोलिसांचा छापा

2

रोख ९८ हजार रुपयांसह जुगार साहित्य केले जप्त

सिंधुदुर्गनगरी, ता.२३ : कुडाळ तालुक्यातील पडवे येथील काजरोबा मंदिराच्या पाठीमागे तीन पानी पत्ते जुगार खेळताना पोलिसांनी रविवारी कारवाई केली. या कारवाईत रोख ९८ हजार रुपये व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण व सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी हि कारवाई केली.

या प्रकरणी एकूण १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक गीतांजली जगताप, आशिष शेलटकर, एस. पी. सुर्वे, ए. एस. गोसावी यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

4