देवगड-तांबळडे येथे ९३ रिडले कासव्याच्या पिल्लांना जीवदान…

8
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.०८: तांबळडे येथे संरक्षित करण्यात आलेल्या ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या घरट्यातून ९३ पिल्ले बाहेर येत समुद्रात झेपावली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी उपजिल्हाधिकारी उपेंद्र तमोरे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, मुख्य अधिकारी कौस्तुभ गव्हाणे नितीन गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिल्ले समुद्रात सोडण्यात आली तसेच मच्छीमार व सागर प्रेमींनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.

षतांबळडे किनारपट्टीवर समुद्री कासवाने अंडी घालून घरटे बनविल्याची घटना कासव मित्र सागर मालाडकर ०७ जानेवारीला समोर आणली होती. सुरुवातीला हे घरटे ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीची होते.

ऑलिव्ह रिडलेने अंडी घालून घरटे बनविल्यानंतर ५२ दिवसांनी घरट्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. सकाळी कासवाची पिल्ले घरट्यामधून बाहेर येतील, याचा घरट्याचे रक्षक सागर मालंडकर यांना अंदाज असल्यामुळे ते पहाटे पासूनच घरट्याजवळ पहारा देत होते.  घरट्यामधून ९३ पिल्ले बाहेर आली. यावेळी पुजा लुटे, प्रकल्प सन्वयक, कांदळवन प्रतिष्ठान, वनपाल सारीक फकीर ,वनरक्षक निषाद साटे , प्राध्यापक दफ्तरदार आदी उपस्थित होते.