Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादेवगडच्या विकासासाठी कायम कटीबद्ध

देवगडच्या विकासासाठी कायम कटीबद्ध

नितेश राणे : वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दिला शब्द

देवगड, ता. 23 : निवडणुकात जय-पराजय होत राहील. परंतू देवगडकरांचा विकास डोळ्यासमोर ठेवून येथील जनतेचा विकास होण्यासाठी मी कायम प्रयत्न करेन असा विश्वास आमदार तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला.
देवगड येथील विविध संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने आज आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, मला निवडून देण्यामागे देवगड तालुक्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे आभार मी कोणत्या शब्दात मानू हे मला कळत नाही. देवगडच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. देवगडच्या विकासासाठी डॉक्युमेंटरी तयार केली आहे. याचे काम काही अंशी झाले आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात विकास बाकी आहे. येणार्‍या काळात देवगडला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असतील. यावेळी अमोल तेली, संजय नारकर, प्रियांका साळसकर, सावी लोके, आरिफ बगदादी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments