Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागाबीत समाजाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. प्रमोद कोळंबकर तर सचिवपदी महेंद्र पराडकर...

गाबीत समाजाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. प्रमोद कोळंबकर तर सचिवपदी महेंद्र पराडकर…

 

मालवण, ता. २३ : सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज संस्थेच्या मालवण तालुका शाखेच्या नवीन कार्यकारीणीची निवड आज झाली. यात तालुकाध्यक्षपदी डॉ. प्रमोद कोळंबकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी सौ. चारुशीला उर्फ अन्वेषा आचरेकर व सचिवपदी महेंद्र पराडकर यांची निवड झाली आहे.
गाबीत समाज मालवण तालुका शाखेच्या कार्यकारीणी निवडीची सभा आज जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील मामा वरेरकर नाट्यगृहात झाली. यावेळी जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सरचिटणीस तुळशीदास गावकर, माजी सचिव भिसाजी कांदळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी निवडलेली कार्यकारीणी अशी- सहसचिव- गंगाराम आडकर, खजिनदार- मिथुन मालंडकर, सहकोषाध्यक्ष- भाई कासवकर, सल्लागार – महेश जुवाटकर, सदस्य- हरी खवणेकर, सौ. सेजल परब, सौ. पूजा सरकारे, सौ. दर्शना कासवकर, अनुष्का मालंडकर, सौ. दीक्षा ढोके, शंकर वाघ, नरेश हुले, प्रदीप मोर्जे, संतोष ढोके, सौ. राधिका कुबल, पवन पराडकर, अरविंद मोंडकर यांचा समावेश आहे.
नूतन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील गाबीत समाजाच्या जनगणनेचे काम करणारे माजी सचिव भिसाजी कांदळगावकर व माजी तहसीलदार आनंद जामसंडेकर यांचा श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित गाबीत समाजबांधवांनी गाबीत समाजाला जातीचा दाखला, शैक्षणिक सवलती मिळविताना येणाऱ्या अडचणी व इतर समस्या मांडल्या. यावेळी श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करताना नूतन कार्यकारीणी व सदस्यांनी तळागाळात जाऊन गाबीत समाज बांधवांचे प्रश्न जाणून घ्यावेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी गाबीत समाज संघटना प्रयत्न करेल असे सांगितले. सर्वांच्या समन्वयातून नूतन कार्यकारीणीने समाजासाठी काम करावे, असेही ताम्हणकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन चंद्रशेखर उपरकर यांनी केले. यावेळी दिलीप घारे, नगरसेवक पंकज सादये, अनिल कुबल, अनिल करंजे यांच्यासह गाबीत समाज बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments