बबन साळगावकर:पालिकेकडून रोटरी पदाधिका-यांचा सत्कार
सावंतवाडी. ता,२४: शवपेटी सारखी सुविधा देऊन सावंतवाडी रोटरी क्लबने शहरातील लोकांशी आपुलकी राखली.असे प्रतिपादन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केले.
रोटरी क्लबच्यावतीने आचारसंहिता काळात सावंतवाडी पालिकेला शवपेटी देण्यात आली होती. आज हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष व्ही.एन. कामत, सुहास नायडू,राजू पनवेलकर,आबा कशाळीकर,सत्यजित धारणकर, वसंत करंदीकर,टी व्ही पाटील, सुधीर नाईक, काका परब, सुहास सातोस्कर, काका परब, नागेश कदम, कांता काणेकर, राजेश रेडीज, नगरसेवक बाबू कुडतरकर, दिपाली सावंत, दिपाली भालेकर, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.
यावेळी श्री साळगावकर म्हणाले एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटी असणे काळाची गरज आहे. सावंतवाडी पालिकेच्या माध्यमातून ही सेवा द्यायची होती. परंतु काही तांत्रिक कारणाने ते शक्य झाले नाही. मात्र ती मागणी रोटरी क्लबने पुर्ण केली आहे. सामाजिक कामात नेहमीच सहभाग असतो त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा .
यावेळी कामत म्हणाले सावंतवाडीत शवपेटीची सुविधा गरजेची आहे अशी मागणी नागरींकाकडुन होत होती. त्यामुळे यासाठी पुढाकार घेतला याचा फायदा निश्चितच होईल यात काही शंका नाही.