Thursday, October 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामराठी शाळा वाचवण्यासाठी सावंतवाडी धरणे...

मराठी शाळा वाचवण्यासाठी सावंतवाडी धरणे…

महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषदेच्या आंदोलनाला पाठिंबा…

सावंतवाडी ता.२३:  बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रामीण भागातील १ ली ते ४ थी पर्यंतच्या ८७ मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकारने योग्यती पाऊले उचलावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष अण्णा केसरकर यांनी आज येथे केली.मराठी शाळा वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषद यांनी आझाद मैदानावर आज पासून सुरू केलेलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातुन पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती,सिंधुदुर्ग शेतकरी संघटना तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय दाधिकार्‍यांच्या वतीने जिमखाना मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.
यावर्षी ग्रामीण भागातील  ८७ मराठी शाळा पटसंख्या कमी असल्याच्या कारणाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत.त्या बंद होता कामा नयेत तसेच प्रत्येक शाळेत मराठी भाषा ही सक्तीची असावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी सुरेश भोगटे,देविदास इंगळे,अफरोज राजगुरू,संतोष दळवी,लक्ष्मण कुडतरकर,तसेच विद्यार्थी सेनेचे आशिष सुभेदार,अतुल केसरकर,संतोष भैरवकर,ओंकार कुडतरकर,सत्यजित धारणकर ललिता नाईक,संकेत मयेकर,संकेत शेटकर,गणेश नाईक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments