आयुष्यमान भारत अंतर्गत ६० जणांना ओळखपत्र वाटप.
वेंगुर्ले : ता.२४ : उभादांडा गावचे विशेष कार्यकारी अधिकारी व शिवसेना विभाग प्रमुख श्री. कार्मिस आल्मेडा यांनी आयुष्यमान भारत अंतर्गत योजनेचे ओळखपत्र जिल्हा रुग्णालय ओरोस येथील महात्मा फुले कार्यालय मधून ओळखपत्र करून आणली आणि ५ लाख पर्यंत वर्षाकाठी आरोग्य विमा अंतर्गत सुमारे २८ कुटुंबातील ६० जणांना त्याचे वाटप केले.
उभादांडा हा वितरण कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. उमेश वाळवेकर , पंचायत समिती उभादांडा सदस्य सौ. अनुश्री कांबळी, माजी सरपंच श्री. इलियास फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्या सौ. कालेस्तीना आल्मेडा, श्रद्धा कुडाळकर ,श्री. दयानंद खर्डे, श्री. श्रीकांत घाटे यांचा हस्ते करण्यात आला. या योजनेअंतर्गत पंतप्रधान आरोग्य विमायोजनेचे ओळखपत्यानुरूप १३७१ शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. त्याचा आपल्या गावातल्या लोकांना फायदा मिळवा यासाठी श्री. आल्मेडा हे याप्रकारचे समाजकार्य करत असतात.
तसेच शिरोडा हायस्कूल मधून १० वी मध्ये प्रथम आलेली मलायका फर्नांडिस , उभादांडा हायस्कूल ची १० वी मध्ये प्रथम आलेली कु. मैत्रिली मांजरेकर तर कुणाल संदीप पेडणेकर हा पोहणे या प्रकारात जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमामधे श्री. मॅक्सी फर्नांडिस, आगोस्थिन फर्नांडिस , नामदेव कुडाळकर ,बाबाजी कांबळी ,विनायक रेडकर, प्रमोद तांडेल, व घाब्रू आल्मेडा उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थी व प्रमुख अतिथीनी श्री. कार्मिस आल्मेडा यांचे सातत्त्याने समाजकार्य घडत असल्याबद्दल आभार मानले.