चित्रपटाच्या शुटींगमधून मिळालेले मानधन दिले शाळेला…

489
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वराडकर हायस्कुल कट्टाच्या विद्यार्थी व शिक्षकांचा दानशूरपणा…

 
सिंधुदुर्गनगरी ता.२४: जिल्ह्यात एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून यामध्ये एका लेझीम नृत्याचा समावेश आहे. या लेझीम नृत्याचे चित्रीकरण मालवण तालुक्यातील ऐतिहासिक तथा प्रसिद्ध धामापूर तलावाकाठी करण्यात आले. या लेझीम नृत्यामध्ये मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला. जवळपास रात्रभर हे शुटींग चालले. सोबत पालकांनाही शुटींगमध्ये भाग घेता आला. यासाठी त्यांना १५ हजार रुपये मानधन देण्यात आले होते. हे मानधन विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेला शैक्षणिक विकासासाठी सुपूर्त केले.
मानधन रक्कम प्रशालेचे मुख्याध्यापक संजय अग्निहोत्री यांनी संस्था सचिव श्रीमती देसाई व शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर यांचेकडे सुपुर्द केली. या उपक्रमासाठी क्रीडा शिक्षक संजय पेंडुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्तुत्य उपक्रमासाठी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा या शिक्षण संस्थेने प्रोत्साहन दिले होते. एका मराठी चित्रपटातील गाण्यामध्ये प्रशालेची मुले झळकल्याने प्रशाला, सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
\