कुडासे ग्रामपंचायत पोट निवडणूकीत अभिजित शेर्लेकर विजयी…

2

दोडामार्ग ता.२४: कुडासे ग्रामपंचायतीच्या सदस्याने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत गाव पँनलच्या श्री अभिजित शेर्लेकर यांनी श्री रामदास मेस्त्री यांचा पराभव करत बाजी मारली. यात श्री. शेर्लेकर यांना १३६ मते मिळाली तर रामदास मेस्त्री यांना १०९  एवढे  मतदान झाले.
या विजयाने गाव पँनलची सत्ता आणखी भक्कम झाली असून सुशिक्षित, गावाच्या विकासात हातभार लावणाऱ्या युवक उमेदवाराचा विजय झाल्यामुळे गाव पँनलमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून अभिजीत शेर्लेकर यांचे अभिनंदन होत आहे, तर श्री रामदास मेस्त्री हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांच्या या पराभवामुळे शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या धक्का बसला असे  ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
विजयोत्सव साजरा करण्यासाठी या वेळी अजय परब, हरी देसाई, चेतन देसाई, प्रसाद कुडासकर ,
हेमंत देसाई ,सुनील राऊत, सुशांत राऊत ,आनंद घाडी, सतीश देसाई ,देवेन्द्र देसाई  आदी उपस्थित होते

4