2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पालिका आक्रमक : गुन्हे दाखल करू, साळगावकर
सावंतवाडी, ता. 24 : येथील पालिकेच्या पाळणेकोंड धरणावर काही अज्ञात पन्नास ते साठ युवकांकडून धरणात उतरून मासे चोरीचा प्रकार काल घडला. याबाबत माहिती मिळताच पालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान काल त्या ठिकाणी गेलेल्या काही युवकांच्या दुचाकीची हवा सोडून टाकण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात आली. तर धरणक्षेत्रात जाण्यास बंदी असल्यामुळे संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे. त्यांनी याबाबतची माहिती दिली. धरण क्षेत्रात परवानगीशिवाय जाणे, मासेमारी करणे, जलाशयात जाणे, मासे चोरी करणे हा गुन्हा आहे आणि संबंधितांवर प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा साळगावकर यांनी दिला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.