शहीद जवानांच्या कुटुंबियांवर अन्याय नको, कायदेशीर वारसांना जमिनी दया, भाजपाची प्रांताकडे मागणी

2

सावंतवाडी,ता.२४: शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीला किंवा कायदेशीर वारसाला शासनामार्फत जमिन दिली जाते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३९ शहीद जवानांचा कुटुंबापैकी फक्त ३ कुटुंबाना या जमिनी मंजूर झाल्या आहेत.

शहीद जवानांच्या कुटुंबावर हा अन्याय आहे.प्रशासन टाळाटाळ करत आहे असा आरोप करत या कुटुंबातील व्यक्तींनी आज माजी आमदार राजन तेली भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.श्री तेली यांनी याबाबत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली.यात लवकरात लवकर जमिनी मिळतील यासाठी प्रयत्न करू तसेच आलेले प्रस्ताव लगेच मार्गी लावू असे आश्वासन खांडेकर यांनी दिले. यावेळी भाजपाचे अजय सावंत,महेश धुरी तसेच सीताबाई कुडतरकर,सरस्वती पंडित,मीनाक्षी शेडगे,पार्वतीबाई नाईक,तिलोत्तमा सावंत,कुणाल घाडी,सीताबाई गवस,अक्षता सावंत,विद्या नाईक,कुणाल घाडी,सुप्रिया तेजम,अक्षता सावंत,मंदाकिनी गायकवाड आदी उपस्थित होते.
________________________
*?प्रवेश सुरू ?प्रवेश सुरू ?प्रवेश सुरू*

*—–?—-KCR—-?——–*
Institute Of Hotel Management
*महाराष्ट्र शासन व्यवसाय प्रशिक्षण मंडळ मान्यताप्राप्त कोर्सेस*

? *डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी :* पात्रता १२वी पास, कालावधी :१ वर्ष
? *कुकरी हाउसकिपिंग :* पात्रता १० वी पास/नापास, कालावधी :३ ते ६ महिने
*—–?% नोकरीची हमी—–*
———–▪ *वैशिष्ट्ये*▪————-
? एसटी पास सुविधा,शैक्षणिक. ? कर्जासाठी बँकेतर्फे सुविधा. ? भरपूर प्रात्यक्षिके. ? बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा. ? ब्लेझर व किचन युनिफॉर्म. ?अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक व कर्मचारी वर्ग. ? मुलींसाठी फीमध्ये सवलत. ?सलग बारा वर्षांची उज्ज्वल परंपरा.

*पत्ता : कोंकण क्राऊन रीसॉर्ट*
निरवडे, सावंतवाडी

*Ph : 02363-258555*
*Mob : 9860405427 | 9833866192 | 9822149014*
_____________________________
*Breaking Malvani*
YouTube Link :
https://www.youtube.com/channel/UC26AyagZUjq41hudfGa6E3A

4