डी. के. सुतार; वाहतूक नियंत्रकांना दिला निवेदनाव्दारे इशारा
वैभववाडी, ता. २४ : वैभववाडी येथे नव्याने सुरू झालेल्या बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे व दलदल झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी येत्या सात दिवसांत याठिकाणी खड्डे बुजवून खडीकरण करावे. अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी वाहतूक नियंत्रकांना निवेदनाव्दारे दिला आहे.
गेली अनेक वर्षे सुसज्ज बसस्थानक व्हावे. अशी मागणी तालुकावासियांमधून होत होती. अखेर तालुकावासियांची ही मागणी पूर्ण झाली. नवीन जागेत बसस्थानक स्थलांतर करण्यात आले. परंतु प्रवाशांना ज्या सुविधा गरजेच्या आहेत. त्या मिळत नाहीत. बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे तसेच दलदल झाल्याने आबाल वयोवृद्धांना एस. टी. मध्ये चढउतार करताना कसरत करावी लागते. तरी याठिकाणी खड्डे बुजवून खडीकरण करावे. अन्यथा कोणत्याहीक्षणी तळेरे-वैभववाडी-कोल्हापूर तसेच फोंडा कणकवली या मुख्य रस्त्यावर वैभववाडी तालुकावासियांच्यावतीने रास्ता रोको करण्यात येईल. असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी वाहतूक नियंत्रकांना निवेदनाव्दारे दिला आहे.