वेंगुर्लेतील मिनी पर्ससीन मच्छिमारांच्या समस्यांना वाचा फुटणार

2

 

माजी आमदार राजन तेली यांच्या सोबत उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

वेंगुर्ले, ता. २४ : वेंगुर्ले येथील आधुनिक रापण व मिनी पर्ससीन मच्छिमार आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी माजी आमदार राजन तेली यांच्या सोबत उद्या २५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
वेंगुर्ले येथे उद्याच्या भेटी कार्यक्रमाच्या संदर्भात आज आधुनिक रापण संघाची बैठक राजन तेली यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत मिनी पर्ससीन धारकांवर वारवार होणारा अन्याय यावर जास्त चर्चा झाली. कायम स्वरुपी एका बाजूचा विचार करुन आम्हा मिनी पर्ससीन मच्छिमारांना व्यवसाय करताना होणारा त्रास सहन करावा लागतो आशा भावना मच्छिमारांनी यावेळी बोलून दाखवल्या. याला वाचा फोडण्यासाठी माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचे व या भेटीसाठी कोणी कोणी जायचे याचे नियोजन करण्यात आले. यावेळी दादा केळुसकर, बाबा नाईक, अशोक सारंग, जनार्दन कुबल, सुधाकर वेंगुर्लेकर, अशोक खराडे, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळू देसाई व अन्य मच्छिमार उपस्थित होते.

4