वेंगुर्ले येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांच्यामार्फत विक्रेत्यांना छत्र्या वाटप

2

 

वेंगुर्ले, ता. २४ : वेंगुर्ला भाजी मार्केट व मासे मार्केट येथील विक्रेत्यांना माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांच्यामार्फत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
भाजी, फळे, फुले , विक्रेत्या महिला व पुरुषांना मोठ्या छत्र्या देण्यात आल्या. गरीब शेतकरी , किरकोळ व्यापारी, मच्छीमार यांना पावसाच्या वेळी बाहेर सोई सुविधा नसल्यामुळे भिजत व्यापार करावा लागतो हे लक्षात घेऊन मतदार संघातील तिन्ही तालुक्यात असे छत्र्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान आजच्या कार्यक्रमाला वेंगुर्ला भाजपा तालुका अध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, शहर अध्यक्षा अँड. सुषमा प्रभू खानोलकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, वृंदा गवंडळकर, नगरसेविक धर्मराज कांबळी, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, मच्छिमारनेते दादा केळुसकर, उपसरपंच गणपत केळुसकर तसेच अशोक सारंग, , बाबा नाईक, अशोक खराडे, जनार्दन कुबल तसेच आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच विक्रेते यांच्या उपस्थितीत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

9

4