आंबोली सैनिक स्कुलमध्ये ऑलंपिक हॉकी दिन साजरा

2

आंबोली, ता. 24 : सिंधुदुर्ग जिल्हा हॉकी संघटनेच्यावतीने नुकताच आंबोली येथील सैनिक स्कुलमध्ये ऑलंपिकदिन साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग हॉकी संघ व सैनिक स्कुल आंबोली यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळण्यात आला.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन व हॉकी इंडिया यांच्या माध्यमातून ऑलंपिक दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैनिक स्कुलचे अध्यक्ष पीटर डान्टस, कमांडर पी. एस. सिन्हा, क्रिडा प्रशिक्षक मनोज देसाई, सिंधुदुर्ग संघटनेचे शैलेश नाईक, राजन रेडकर, किरण पेंडूरकर, सौरभ नागोळकर, एस. एम. शिंदे आदी उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून भारताच्या हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक क्लेरेंस लोबो यांनी यावेळी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंच जावेद शेख, जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोर्डेकर, सचिव राजन रेडकर आदी उपस्थित होते.

89

4