वैभववाडी/प्रतिनिधी; समृद्ध वैभववाडी प्रतिष्ठान, वैभववाडी तालुका यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अरुणा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी भोम गाव येथे वृक्षारोपण मोहीम राबवली. अरुणा धरणाची घळभरणी झाल्यापासून गावकरी आपली घरे गावाच्या पूर्व दिशेला डोंगरमाथ्यावर आपले संसार थाटत आहेत. तिथले प्रसन्न वातावरण व डोंगरदऱ्यांच्या कुशीत टुमदार घरे उभी राहत आहेत.
या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नवीन उभारणीसाठी शुभेच्छा म्हणून आंबा, आवळा, कोकम, लिंबू, चिकू, पेरू इत्यादी प्रकारची झाडे वाटण्यात आली. हा कार्यक्रम येथील शेतकऱ्यांना प्रेरणादायी आणि आपलासा वाटला. हे धरण उभारताना करोडो झाडे झुडपे तोडण्यात आली. पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी थोडासा हातभार म्हणून समृद्ध वैभववाडी प्रतिष्ठान ने या परिसरात प्रत्येकाला उपयोगी पडतील अशी कलम झाडेवाटप केले.
यावेळी भोम येथील बबन जाधव, आदिनाथ जाधव, प्रभावती जाधव, दिनेश पाटेकर, ह. भ. प. दत्ताराम भालेकर, विनोद जांभळे, वामन मोरे, शांताराम तळेकर आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
त्याचबरोबर समृद्ध वैभववाडी प्रतिष्ठान चे सभासद, गणेश पावले, गणेश मोरे, प्रवीण जामदार, सुशांत मोरे, सचिन सावंत, उमाकांत जाधव, प्रल्हाद जामदार उपस्थित होते.
समृद्ध वैभववाडी प्रतिष्ठानची भोम येथे वृक्षारोपण मोहीम
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES