वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीकडून महिलांचा सन्मान

2

महिला आरक्षणाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रम

वेंगुर्ले : ता.२४ : महिला आरक्षणास आज २५ वर्षे झाल्याबद्दल वेंगुर्लेत राष्ट्रवादी काँगेस तर्फे विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँगेसच्या वतीने महिला आरक्षणास २५ वर्षे झाल्याबद्दल वेंगुर्ले कॅम्प येथे हा कार्यक्रम झाला. दिपप्रजवलंन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एम.के.गावडे, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, उपाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला कार्याध्यक्ष सरोज परब, महिला तालुका अध्यक्ष दीपिका राणे, पं. स.सदस्या साक्षी कुबल, माजी उपनगराद्यक्ष वामन कांबळे, नितीन कुबल आदीसह महिला उपस्थित होते.
२४ जून १९९४ रोजी माजी मुख्यमंत्री शरद पवार यानी महिला आरक्षणाचे धोरण जाहीर केले.महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजेत. आरक्षणाच्या माध्यमातून उच्चशिक्षित महिलांनी निर्णयप्रक्रियेतून महिलांच्या हिताचे निर्णय घ्यावेत,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते एम.के.गावडे यानी वेंगुर्ले येथे केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महिलांचा नेहमी सन्मान करतो. आरक्षणामुळे महिला आज सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. फक्त आरक्षण मंजूर करून न थांबता पवार साहेबानी बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या विकासाच्या दृष्टीनेही पाऊले उचलली असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हा महिला अध्यक्ष नम्रता कुबल यांनी दिली.
दरम्यान विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मीराताई जाधव, रंजना कदम (देवगड), भाविका काळोजी ( सावंतवाडी), अरुणा सावंत (मालवण), पं स सदस्या साक्षी कुबल (वेतोरे) इत्यादींचा सत्कार करण्यात आला.तसेच वसुधा मेस्त्री व निकिता गावडे या विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी एम. के. गावडे यांनी रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. bयावेळी सरोज परब, योगेश कुबल यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक तालुका अध्यक्ष धर्माजी बागकर व आभार योगेश कुबल यांनी मानले.

4

4