मिनरल वॉटरच्या नावाखाली ग्राहकाच्या जीवाशी खेळ नको

2

आमदार गजभिये : थंड पाणी विकणार्‍या व्यावसायिकांच्या चौकशीची मागणी

मुंबई, ता. 24 : राज्यात मिनरल वॉटरच्या नावावर थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोस सुरू आहे. अशा विक्रेत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी आज विधान परिषदेत केली.
ते म्हणाले, लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांना आता राजरोसपणे मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाणी विकले जात आहे. ते पाणी नेमके कुठून आणले जाते. फिल्टर करण्यासाठी काय केले जाते याचा थांगपत्तासुद्धा लागत नाही. 20 ते 60 रुपयांपर्यंत हे पाणी विकून ग्राहकाची फसवणूक केली जात आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही वॉच नाही. त्यामुळे ग्राहकाच्या आरोग्य सुविधेसाठी अशा व्यापार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री. गजभिये यांनी केली.

2

4