जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

155
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ल्यात सर्वाधिक 134 मि.मी पाऊस

सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 134 मि.मी. पाऊस झाला आहे.  गेल्या चोवीस तासात 49.25 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला  असून 1 जून 2019 पासून आता पर्यंत 359.95  मि.मी. सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 58 (375), सावंतवाडी 09 (184), वेंगुर्ला 134.04 (430.64), कुडाळ 31 (330), मालवण 51 (424), कणकवली 46 (391), देवगड 13 (356), वैभववाडी 52 (389) पाऊस झाला आहे

\