कणकवलीवासियांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे

2

 

कणकवली, ता. 25 : महामार्ग चौपदरीकरणाच्या बोगस कामामुळे त्रस्त झालेल्या कणकवली करांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी हायवेचे उप अभियंता प्रकाश शेडेकर प्रांत कार्यालयात चर्चा करण्यासाठी येणार होते. मात्र सुमारे एक तास उलटूनही शेडेकर प्रांत कार्यालयात येत नसल्याने शहरवासीयांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मुजोर हायवे ठेकेदार आणि हायवे प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी बाळू मेस्त्री, संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, आशिये सरपंच सौ.बाणे, कणकवली पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, संजय मालंडकर, विलास कोरगावकर, महेश सावंत, दादा कुडतरकर, सुनील कोरगावकर, प्रदीप मांजरेकर, सुदीप कांबळे, सुशील सावंत, अण्णा कोदे, रोटरी क्लबचे महेंद्र मुरकर, रुपेश नेवगी आदी उपस्थित होते.

12

4