वैभववाडी / प्रतिनिधी : विद्या मंदिर प्राथमिक शाळा हेत येथे माजी विद्यार्थी संघटना हेत गुरववाडी मंडळ मुबंई यांच्यावतीने विद्या मंदिर प्राथमिक शाळा हेतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी पहिली ते सातवीत शिकणा-या एकुण ८० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, छञी, कंपासपेटी, वह्या, पेन साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच संतोष फोंडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद खानविलकर, केंद्र प्रमुख विजय केळकर, अनंत फोंडके, उत्तम फोंडके, मुख्याद्यापक श्री. पारकर, संजय राणे, प्रदिप गुरव, राजू फोंडके, प्रदिप फोंडके, शंशाक फोंडके, नारायण फोंडके, देवानंद फोंडके आदी ग्रामस्थ पालक व शिक्षक उपस्थित होते.