तेरवण मेढेतील दारू बंदीसाठी विवाहीतेची पोलिसात धाव

150
2

 

पोलिस निरीक्षकांना निवेदन:दारू विकणा-या पाच जणांच्या विरोधात तक्रार

दोडामार्ग, ता. 25 : मद्यधुंद अवस्थेत मारहाण करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून मुळस येथील एका महिलेने तेरवण मेढे मुळस येथील अवैध दारु विक्री बंद करण्याचे लेखी निवेदन येथील पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
या निवेदनात संबंधित महिलेने या गावात विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या पाच व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावातच दारू विकली जात असल्याने माझे पती दारु पिऊन रहातात आणि मला मारहाण करतात. त्यामुळे दारू बंदी होणे गरजेचे असून महिलांना होणारा त्रास पोलिसांनी लक्षात घ्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी विनंती या महिलेने केली आहे.

4