Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहायवे सुस्थितीत करून देण्याची हायवे अभियंत्यांची ग्वाही

हायवे सुस्थितीत करून देण्याची हायवे अभियंत्यांची ग्वाही

कणकवलीकरांचे आंदोलन मागे : प्रांताधिकारी कार्यालयात चर्चा

कणकवली, ता. २५ : कणकवली शहरातील महामार्गाची दोन तासात डागडुजी करून देणे, शहरातील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड चांगल्या दर्जाचे करून दिले जातील. संपूर्ण रस्त्याचे सपाटीकरण आणि दोन्ही बाजूला गटार व्यवस्था करून दिली जाईल आदी आश्वासनानंतर कणकवलीकरांनी हायवे काम बंद आंदोलन मागे घेतले. मात्र जोपर्यंत हायवे अभियंत्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद ठेवण्याचा इशारा देखील कणकवलीकरांनी दिला.
हायवेच्या निकृष्ट कामामुळे त्रस्त झालेल्या कणकवली तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येऊन आज सकाळी हायवे चौपदरीकरणाचे काम बंद पाडले. त्यानंतर प्रांत कार्यालय आणि मुख्य पटवर्धन चौकात रास्ता रोको केला. तर दुपारी एक वाजता प्रांताधिकारी कार्यालयात हायवेचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, स्वाभिमानचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, अनिल हळदीवे, संजय मालंडकर, प्रदीप मांजरेकर, विनायक सापळे, विलास कोरगावकर, महेश सावंत, आशिये सरपंच सौ.बाणे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष दादा कुडतरकर, महेंद्र मुरकर तसेच सुनील कोरगावकर, सुदीप कांबळे, रुपेश नेवगी आदींसह शहर आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments