काही झाले तरी सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी लढविणार

2

दिलीप पाटील ः निवडणुक लढविण्यासाठी अनेक चेहरे इच्छुक

सावंतवाडी, ता. 25 ः राष्ट्रवादीकडून काही झाले तरी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ लढविला जाणार आहे. तशी कार्यकर्त्यांसोबत खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही आतापासूनच कामाला लागलो आहोत. अनेक चेहरे निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक दिलीप पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. आज जिल्हा राष्ट्रवादीची सभा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत तीनही जागा पक्षाने लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र परंपरागत चालत असलेला सावंतवाडी मतदार संघ आम्ही लढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज झालेल्या बैठकिचा अहवाल पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा निरीक्षक अर्चना घारे, जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, नम्रता कुबल आदी उपस्थित होत्या.

0

4