सावंतवाडी, ता. २५ : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कात बनविणाऱ्या शेतकऱ्यांना जीएसटीमध्ये सूट द्यावी तसेच कोकणातील शेतकऱ्यांनी के तयार केलेला कात माल वाहतूक करतानाची परवानाची अट रद्द करावी, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी अर्थ व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. याबाबतची निवेदन त्यांनी श्री. मुनगंटीवार यांना दिली.
या निवेदनात असे म्हटले आहे की, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात जंगली खैर या झाडापासून काही शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून का तयार करतात. यापूर्वी त्यांना व्हॅटमध्ये सवलत होती. परंतु जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यानंतर सदर शेतकऱ्यांना जीएसटी भरावा लागत आहे. त्यामुळे त्यामुळे कात मालावर जीएसटीमध्ये सूट द्यावी तसेच हा काय व्यवसाय करताना खैर या झाडाची वाहतूक करण्यासाठी वनविभागाकडून परवाना घेतला जातो. परंतु खैराच्या झाडापासून का तयार झाल्यानंतर तो बाहेर पाठविताना पुन्हा परवान्याची मागणी केली जाते. ज्याप्रमाणे सागवान व इतर जंगली झाडांपासून फर्निचर तयार झाल्यानंतर वाहतूकीला परवान्याची गरज लागत नाही. त्याचप्रमाणे का तयार झाल्यानंतर परवानाची अट ठेवणे अन्यायकारक आहे. तरी आपणास काही उत्पादन शेतकऱ्यांच्यावतीने अशी विनंती आहे की कात मालाची वाहतूक करताना परवान्याची अट रद्द करावी.