Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहायवेच्या निकृष्ट कामाचा दर्जा पुन्हा उघडकीस

हायवेच्या निकृष्ट कामाचा दर्जा पुन्हा उघडकीस

खारेपाटणला पाइपलाइन फुटल्याने नवीन रस्ता फोडला

कणकवली, ता. २५ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अत्यंत घिसाडघाईने होत असल्याने पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. खारेपाटण हायवे कार्यालयाच्या समोरच नवीन तयार केलेला रस्ता नळयोजनेची पाइपलाइन फुटल्याने फोडावा लागला. त्यामुळे हायवे ठेकेदार प्रवाशांच्या जीविताशी खेळत असल्याची बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
खारेपाटण शहरात महामार्ग चौपदरीकरणांतर्गत दोन मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. यातील एक मार्गिका हायवे प्राधिकरण कार्यालयासमोर खचू लागली होती. त्यामुळे कालपासून ही मार्गिका वाहतुकीस बंद करण्यात आली. आत याठिकाणी दोन ते तीन फुटाचा पुन्हा खड्डा पडला आणि त्यातून पाणी येऊ लागले. त्यामुळे नवीन हायवे तब्बल 15 फुट खोल खणण्यात आला. त्यावेळी खारेपाटण शहराला पाणी पुरवठा करणारी नळयोजना नव्या हायवेखाली लिकेज झाल्याची बाब लक्षात आली. वस्तुतः हायवे चौपदरीकरण करताना प्रत्येक गावाची नळयोजना नव्याने करण्याचे निर्देश आहेत. त्यासाठीची तरतूद देखील चौपदरीकरण करण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराने नळयोजनेसाठीची नवीन पाइपलाइन न टाकता जुनी नळयोजना तशीच ठेवल्याने अख्खा रस्ताच फोडावा लागला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments