आमदार नितेश राणेंची गिरीश महाजन यांच्याकडे मागणी
वैभववाडी, ता. २५ : अरुणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा त्यांना आवश्यक असलेल्या १८ नागरी सुविधा द्या अशी मागणी महाराष्ट्र साहेबांचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. आज याबाबत त्यांनी श्री महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की संबंधित प्रकल्पग्रस्तांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. त्यांनी धरण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपल्या जमिनी कवडीमोलाने दिल्या मात्र आता त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या प्रकल्पग्रस्तांना जनावरांसारखी उघड्या राहावे लागत आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचे हाल बनवले जात नाही त्यामुळे तात्काळ याबाबत योग्य ती भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी मागणी राणे यांनी केली आहे.