माध्यमिक अध्यापक संघाचे २९ ला धरणे आंदोलन…

144
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.२६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळ व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्या आदेशानुसार २९ जून २०१९ रोजी दु ३ ते ५ या वेळेत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ जिल्हा परिषद प्रवेशद्वारा समोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शासनाचे अनुदानीत, विनाअनुदानित, खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी याबाबत धारसोडीचे अवलंबलेल्या शैक्षणिक धोरणा विरोधात तसेच शिक्षक, विद्यार्थी विरोधी भूमिकेमुळे शैक्षणिक क्षेत्रात तीव्र नाराजी व असंतोष वाढला आहे. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. यांसह अन्य प्रमुख १६ मागण्यासाठी शासनाच्या जाचक निर्णयांच्या निवारणार्थ सनदशीर मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री यांना देण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकात अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, कार्यवाह पांडुरंग काळे यांनी नमूद केले आहे.