अन्यथा….. वन मजुरांना कोंडून ठेवू | केर ग्रामस्थांचा इशारा: वनअधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी

2

दोडामार्ग, ता.२६/महेश लोंढे : केर पंचक्रोशीत स्थिरावलेले हत्तींचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने वनविभाग अधिका-यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे वन अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. आमच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना अधिकारी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही तर उपयोग काय असा प्रश्न करीत जोपर्यंत अधिकारी बैठकीला अधिकारी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी असलेल्या वन मजुरांना कोंडून ठेवू असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतची माहिती केरचे उपसरपंच महादेव देसाई यांनी दिली.
ते म्हणाले गेल्या काही दिवसात केर पंचक्रोशी हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. याबाबत वारंवार कल्पना देऊन सुद्धा वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे हत्तींचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा हत्ती हटाव मोहीम राबविण्यात यावी या बाबत नियोजन करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता केर येथील चव्हाटा मंदिरात ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेला येण्याचे मान्य करून सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी आले नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत वन अधिकारी या ठिकाणी येऊन योग्य ते उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. असा इशारा उपसरपंच महादेव देसाई यांनी दिला आहे.

20

4