धरणाच्या पाणी साठ्यात वाढ; प्रशासनासमोर पेच….
वैभववाडी ता.२६:अरुणा पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांचा तिडा सुटता सुटेना. पाणी वस्तीपर्यंत आल्याने आखवणे, नागपवाडी, भोम येथील प्रकल्पग्रस्त संतप्त झाले आहेत. पाण्यात बुडून मेलो तरी गाव सोडणार नाही. अशी आक्रमक भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.
खा.विनायक राऊत यांनी २२ जूनच्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नांसाठी कॕम्प घेण्याची सूचना केली होती.खा.राऊतांसमोर कार्यकारी अभियंता राजन डवरी यांना धक्काबुकी झाल्यामुळे मांगवली पुनर्वसन गावठाणात तलाठी कार्यालयात कॕम्पघेण्यात आला होता.माञ याला सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे, विलास कदम,प्रकाश सावंत, वामन बांद्रे, ज्ञानदेव चव्हाण, यांनी आक्षेप घेत गावात कॕम्प घेण्याचा आग्रह केला.गावात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.याची हमी प्रकल्पग्रस्तांनी दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी जोशी, भाजपा नेते अतुल रावराणे, प्रकल्प अधिकारी ,यांनी आखवणे येथे जाऊन पुनर्वसन , अल्प मोबदला, विवरण पञ, सानुग्रह अनुदान, व वैयक्तिक प्रश्नांवर चर्चा केली.
तानाजी कांबळे व अप्पर जिल्हाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक
यावेळी तानाजी कांबळे व अप्पर जिल्हाधिकारी यांच्यात शाब्दिक चखमक झाली.मोबदल्या बाबत तुम्ही कायदा सांगता मग बेकायदा धरणाची घळभरणी कशी केली? असा सवाल करीत भूसंपादन कायदा आम्हांला वाचायला सांगता मग तुम्ही पुनर्वसन कायदा का वाचीत नाही.असा सवाल केला.