Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआयटीआयमधील रिक्त प्राचार्य पदाचा तिढा सोडवा

आयटीआयमधील रिक्त प्राचार्य पदाचा तिढा सोडवा

युवासेनेची मागणी : पाठपुरावा करण्याचे जोशी यांचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी, ता. 26 : जिल्ह्यातील आयटीआयमध्ये शिकणार्‍या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी रिक्त असलेली तातडीची पदे तात्काळ भरा, अशी मागणी सावंतवाडी युवासेनेच्यावतीने आज उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी आपल्या मागण्या लक्षात घेता रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. याबाबत आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन श्री. जोशी यांनी यावेळी दिले. युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी आज येथे धडक देत श्री. जोशी यांची भेट घेतली. यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, योगेश धुरी, योगेश नाईक, गुणाजी गावडे, सोनू गवस, योगेश तावडे, संदीप महाडेश्वर, संतोष परब आदी उपस्थित होते. यावेळी आयटीआयमधील रिक्त पदे तात्काळ भरा, त्याठिकाणी कार्यरत असलेल्या प्राचार्य हणमंत पाटील यांना समज द्या अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान या मागण्यांची पूर्तता तात्काळ न झाल्यास आमचा आंदोलनाचा पवित्रा कायम राहील असा इशारा यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments