वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर प्रायोगिक तत्वावर सेवा सुरू
सावंतवाडी / भक्ती पावसकर, ता. 26 : वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील मोती तलावात आता बोटींगचा थरार सावंतवाडीसह जिल्ह्यातील पर्यटकांना अनुभवता येणार आहे. येत्या दोन दिवसात ही सेवा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिरोडा येथील स्कुबा डायव्हींग क्षेत्रातील व्यवसायिक राजेश नाईक यांनी प्रायोगिक तत्वावर ही जबाबदारी स्विकारली असून एरव्ही समुद्रकिनार्यावर मिळणार्या बोटींग राईड आता मोती तलावातसुद्धा अनुभवता येणार आहे.
याबाबतची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. ही सुविधा सुरू झाल्यानंतर सावंतवाडीतील बच्चे कंपनीसोबत पर्यटकांनासुद्धा याचा आनंद घेता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालिकेच्या बोट क्लबच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापूर्वी बोटींगची सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सेवा खंडीत झाली होती. पुन्हा एकदा वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या पुढाकाराने सावंतवाडीकरांसाठी राईडचा थरार अनुभवता येणार आहे