एकाच छताखाली आता मंडपाच्या सुविधा…

186
2

 

प्रणय तेली; मंडप व्यवसायिकांचे जिल्हा असोसिएशन स्थापन…

सावंतवाडी ता.२६: एकाच छताखाली येऊन जिल्ह्यातील ग्राहकांना मंडपाची सुविधा पुरवली जाणार आहे.यात सुसूत्रता ठेवली जाणार आहे,तसेच कोणाची फसवणूक होणार नाही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहेत,असे आश्वासन इव्हेंट डेकोरेटर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रणय तेली यांनी आज येथे दिले.सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट,साऊंड,इव्हेंट,कॅटर्स ओनर्स असोसिएशन जिल्हा कार्यकारणीची बैठक आज येथील डिके टुरिझम हॉल मध्ये पार पडली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा कार्यकारिणीची रूपरेषा ठरविण्यात आली.तर या संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या-चांगल्या सुविधा कशा पुरवता येतील या विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी संघटनेतील सर्वांनी प्रयत्न करावे व संघटनेचे नाव जिल्ह्यात रोशन करावे,असे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष प्रणय तेली,उपाध्यक्ष आबा कोटकर,गौरव मुंज,विठ्ठल बटा,मिलिंद धुरी,नितीन सावंत,विशाल चव्हाण, निलेश काणेकर,अमृत काणेकर,नागेश नेमळेकर,योगेश ताम्हाणेकर,अभिजीत परब,वसंत वाळके,दत्तगुरु मोर्ये,अमित अरवारी,पर्सि डायस, दिलीप दळवी,मुन्ना बेग,मृणाल मुद्राळे,रोहित सावंत,प्रवीण मुद्राळे, गोविंद खंदारे,जगदीश सावंत आदी उपस्थित होते.

4