कोलझर शाळेतील समस्या सोडवा | अन्यथा उपोषण : संजय देसाई यांचा प्रशासनाला इशारा

2

दोडामार्ग, ता.२६: जि.प. शाळा कोलझर येथील समस्या सोडवा अन्यथा कोलझर ग्रामपंचायतीसमोर विध्यार्थी पालक,ग्रामस्थ यांच्यासह उपोषण करू असा इशारा स्वाभिमानचे कार्यकर्ते संजय देसाई यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी कोलझर ग्रुप ग्रामपंचायतीचे एक वर्षापुर्वी लेखी निवेदन देऊन लक्ष वेधले होते.शाळेसमोरील गेट, ध्वजस्तंभ, मुलांना खेळावयाचे घसरगुंडी, झोपाळे,शाळेसमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर घालणे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत शाळेतील समस्या न सोडविल्यास ग्रामस्थ, पालक, विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत कार्यालय कोलझर येथे उपोषणास बसण्याचा इशारा स्वाभिमान कार्यकर्ते संजय देसाई यांनी दिला आहे.

30

4