ब्रेकींग मालवणीचा इफेक्ट : ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
सावंतवाडी, ता. 26 : केर येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थ व वनविभाग अधिकार्यांच्या बैठकित वनअधिकार्यांनी पाठ फिरवल्याचे वृत्त ब्रेकींग मालवणीने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तात्काळ दखल वनअधिकार्यांनी घेतली आहे. आम्ही त्या ठिकाणी काही वेळात पोहोचणार असून लोकांचे म्हणणे जाणून घेणार आहोत, असा विश्वास सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी ब्रेकींग मालवणीशी संपर्क साधून दिला. लोकांच्या भावनांशी आम्ही जोडलेलो आहोत. त्या ठिकाणी जाणार होतो, परंतू अधिवेशन सुरू असल्यामुळे काही माहिती द्यावी लागत असल्याने वेळ झाला. परंतू आता त्या ठिकाणी जात आहोत, असे श्री. चव्हाण यांनी संपर्क साधून सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला ब्रेकींग मालवणीच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे.