माणगाव-निळेली रस्त्याची पावसामुळे दुरावस्था…

270
2

माणगाव/ मिलिंद धुरी ता.२६:: गेले दोन दिवस झालेल्या पावसात माणगाव खोऱ्यातील निळेली येथील रस्ता खचला आहे.या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.लोकांना होणारा त्रास लक्षात घेता सदर रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी,अन्यथा आंदोलन करू,असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील कुटुंबांना चिखलाच्या साम्राज्यातून वाट काढावी लागत आहे.या गावातला ८० ते ९० घरांची वस्ती आहे.तसेच येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना चिखलमय रस्त्यातून वाट काढत जावे लागत आहे.त्यामुळे संबंधितांनी याकडे प्रकर्षाने लक्ष घालावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

4