सावंतवाडीतील घटना: किरकोळ कारणावरून झाले होते वाद
सावंतवाडी ता.२६: येथील बसस्थानक परिसरातील एका चायनिज कॉर्नरमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाण प्रकरणाविरोधात चौघांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला होता.यात दिबस सुशील तमांग या नेपाळी आचा-यासह गौतम विनायक साटेलकर रा.भटवाडी हा युवक गंभीर जखमी झाला होता.या प्रकरणी रात्री उशिरा देण्यात आलेल्या तक्रारी नुसार तिघांसह अन्य एक असा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी नेपाळी आचारी दिबस तमांग याने दिलेल्या तक्रारीनुसार गौतम विनायक साटेलकर व ओंकार संतोष कांबळी,गौतम याचा काका यांनी आपण काम करत असलेल्या ठिकाणी आले व आपल्याला मारहाण केली असे म्हटले आहे.
तर गौतम साटेलकर यांनी दिलेल्या तक्रारी म्हटल्याप्रमाणे आपण लक्झरी बस वर गेली काही वर्षे चालक म्हणून काम करत आहे.दरम्यान काल आपल्या गोवा स्थितीत मालकाने आपल्याला देण्यासाठी आपल्या एका मित्राकडे पैसे पाठवले होते.दरम्यान ते पैसे मित्र संबंधित हॉटेलमध्ये ठेवून गेला होता.या पैशांची विचारणा करण्यासाठी आपण हॉटेलमध्ये गेलो यावेळी तेथील नेपाळी आचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.याबाबत जाब विचारला असता त्यांनी आपल्याला हाताच्या ठोशांनी मारहाण केली यात आपण जखमी झाल्याचे म्हटले आहे.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार श्री वरवडेकर करीत आहेत.