दोडामार्गात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

2

दोडामार्ग, ता. २६: तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उद्या (ता.27) दुपारी 3 वाजता दोडामार्ग इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सचिव उमेश तोरसकर, कोषाध्यक्ष संतोष सावंत, कुंब्रलचे सरपंच प्रवीण परब, दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय देसाई आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सर्वसाधारण मुलांबरोबरच काही दिव्यांग मुलांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. सत्कार कार्यक्रमाची नियोजन बैठक आज झाली.यावेळी दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रभाकर धुरी, उपाध्यक्ष तेजस देसाई, सहसचिव संदेश देसाई, कार्यकारिणी सदस्य रत्नदीप गवस, वैभव साळकर, साबाजी सावंत, गणपत डांगी, महेश लोंढे, समीर ठाकूर, जनार्दन परब आदी उपस्थित होते.

8

4